agriculture news in Marathi, agitation of bachhu kadu cancel after promise, Maharashtra | Agrowon

आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन स्थगित
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने आमदार बच्चू कडू यांनी पीकविमा आंदोलन तूर्त मागे घेतले आहे. पीक विम्याचा राज्य हिस्सा म्हणून विविध कंपन्यांना राज्याच्या तिजोरीतून २८४ कोटी रुपये दिले जाणार आहेत.  

पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने आमदार बच्चू कडू यांनी पीकविमा आंदोलन तूर्त मागे घेतले आहे. पीक विम्याचा राज्य हिस्सा म्हणून विविध कंपन्यांना राज्याच्या तिजोरीतून २८४ कोटी रुपये दिले जाणार आहेत.  

पंतप्रधान फळ पीकविमा योजनेतील गेल्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. नगरमधील शेतकऱ्यांनी मात्र याबाबत पाठपुरावा सुरू केल्यानंतर ‘प्रहार’च्या शेती व उद्योग आघाडीचे प्रमुख अभिजित पोटे यांच्या माध्यमातून ही समस्या आमदार कडू यांच्यापर्यंत पोचविण्यात आली होती. 
“कृषी विभागाने निश्चित किती शेतकरी व किती तालुक्यांमध्ये भरपाईपासून वंचित आहेत याची माहिती आम्हाला दिलेली नाही. मात्र, नगर भागातील किमान ४० कोटींची भरपाई अडकून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. आश्वासनाप्रमाणे २० जूनपर्यंत भरपाई न मिळाल्यास जुलैत मात्र आंदोलन केले जाईल,” अशी माहिती ‘प्रहार’च्या सूत्रांनी दिली. 

कृषी विभागाने ‘प्रहार’ला दिलेल्या लेखी माहितीत नगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा उल्लेख केला आहे. डाळिंब, मोसंबी, चिकू फळपिकांसाठी मृग बहारात शेतकऱ्यांचा विमा हप्ता शेवगाव शाखेकडून विमा कंपनीकडे उशिरा दिला गेला. शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन पाठपुराव्यानंतर योजनेत पुन्हा समावेश करण्यात आला आहे. आता राज्य शासनाकडे देखील अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे. 
केंद्राचा अनुदान हिस्सा मिळाल्यानंतर विमा कंपनीकडून पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात भरपाई जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिलेल्या आहेत. त्यामुळे वाट पाहून आंदोलनाचे नियोजन केले जाईल, असेही ‘प्रहार’चे म्हणणे आहे. 

इतर बातम्या
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...