पुणे मार्केटयार्डातील हमाल, मापाडी कामगारांचे आंदोलन स्थगित

मापाडी आंदोलन
मापाडी आंदोलन

पुणे : भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी तोलाई देण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने पुकारलेले धरणे आंदोलन, बाजार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत पणन संचालक किशोर तोष्णिवाल यांनी सकारात्मक अाश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे मंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट यांनी कळविले आहे.  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील भुसार बाजारामध्ये कामगारांची तोलाई न देण्याची भूमिका पूना मर्चंट चेंबरने घेतली. राज्यातील सांगली, धुळे, आंबेजोगाई बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनीही हीच भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ४) ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. नवनाथ बिनवडे, हनुमंत बहिरट, गोरख मेंगडे, संतोष नांगरे, विलास थोपटे, राजेंद्र चोरगे, अंकुश हारपुडे, दादा तुपे या वेळी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने बाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निर्णय कामगारांविरोधी गेल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com