agriculture news in marathi, agitation of communist party for farmers demand, parbhani, maharashtra | Agrowon

पीकविमा योजनेत सुधारणा करा : भाकप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

परभणी : २०१८-१९ मध्ये पीकविमा योजना राबविताना सुधारणा करावी. पीक संरक्षणासाठी ७० टक्के जोखमेची मर्यादा काढून टाकावी. १०० आणि १५० टक्के विमा भरपाईची तरतूद करावी. उंबरठा उत्पादनाच्या निकषात सुधारणा करावी आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी, शेतमजुरांनी धरणे आंदोलन केले.

परभणी : २०१८-१९ मध्ये पीकविमा योजना राबविताना सुधारणा करावी. पीक संरक्षणासाठी ७० टक्के जोखमेची मर्यादा काढून टाकावी. १०० आणि १५० टक्के विमा भरपाईची तरतूद करावी. उंबरठा उत्पादनाच्या निकषात सुधारणा करावी आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी, शेतमजुरांनी धरणे आंदोलन केले.

मंदसौर येथील शेतकरी आंदोलकांवरील झालेल्या गोळीबारात ६ शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला. यास भाजप सरकार कारणीभूत आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांचा यावेळी निषेध करण्यात आला. मंदसौर येथील शेतकरी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

गतवर्षीच्या खरीप पिकांचा तुटपुंजा परतावा मंजूर करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. शासनाबरोबरचा करार मोडीत काढणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी. सोयाबीन तसेच अन्य पिकांच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात यावे. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानापासून वंचित गावांचा समावेश करावा. नवीन पीक कर्जवाटप तत्काळ सुरू करण्यात यावे. वन विभागाकडील रोजगार हमी योजनेच्या कामांची थकीत मजुरी तत्काळ अदा करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन क्षीरसागर, अॅड. लक्ष्मण काळे, अप्पा कुराड, भारत फुके, प्रकाश गोरे, बाळासाहेब हरकळ, गणेश रणनवरे, कुंडिलक कऱ्हाळे, गजनान देशमुख, राधाकिशन गोरे, सचिन देशपांडे आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...