नागपूर येथे पीक नुकसानीच्या मदतीसाठी आंदोलन

नागपूर येथे पीक नुकसानीच्या मदतीसाठी  आंदोलन
नागपूर येथे पीक नुकसानीच्या मदतीसाठी  आंदोलन

नागपूर  ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीची तत्काळ मदत मिळावी, याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीने बुधवारी (ता. ६) नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात शेतातील सडका माल फेकण्यात आला.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल लोकप्रतिनिधी केवळ फोटोसेशनपुरतीच घेत आहेत. यापेक्षा दुसरे कोणतेच काम त्याच्या स्तरावर झाले नसल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत त्यांना मदत मिळावी याकरिता प्रयत्न करावे, अशी मागणी विदर्भ राज्य समितीची आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे कसे नुकसान झाले, हे दाखविण्यासाठी सडका शेतीमाल जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्याचे आंदोलन आज करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच आंदोलकांना अडविण्यात आल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल रस्त्यावरच फेकत निषेध नोंदविला.

पोलिसांनी वेळीच आंदोलनाची दखल घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. समितीचे संयोजक राम नेवले, अरुण केदार, मुकेश मासरुकर, विष्णुजी आष्टीकर, सुनील वडस्कर, वृषभ वानखडे, गुलाब धांडे, शेखर काकडे, गणेश शर्मा, अन्नाजी राजधरे, ॲड. रेवाराम बेलेकर, अनिल केसरवाणी यांच्यासह शेतकरी या आंदोलन सहभागी झाले होते. 

या आहेत मागण्या

  •  पीक नुकसानीचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे तत्काळ करण्यात यावे. 
  • सोयाबीन, धानाला २५ हजार रुपये, कापसाला ३५ हजार तर संत्रा पिकाला ५० हजार रुपये प्रतिहेक्‍टरची भरपाई मिळावी.
  • कर्ज तसेच वीजबिलातून शेतकऱ्यांना मुक्‍त करण्यात यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com