इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे काँग्रेसचा मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. संसदीय समितीतर्फे चौकशीची मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते आहे. देशाचा चौकीदारानेच लुटारूंना कुलपे उघडून दिल्यासारखी स्थिती आहे``, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. इंधन दरवाढीने नागरिक हैराण झाले असून आता दिवाळी साजरी करायची की सरकारची होळी, याचा लोक विचार करीत आहेत, असे ते म्हणाले.

नगर येथे इंधन दरवाढ व इतर बाबींचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (ता. २५) विखे पाटील यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे, आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. लोकांना जगणे महाग झाले आहे. इंधन दरवाढ होत असताना त्याबाबत कोणीही बोलत नाहीत. सरकारने ठरवले तर पंधरा ते वीस रुपयांनी इंधनाचे दर कमी होऊ शकतात, पण सरकारची तशी मानसिकता नाही.  सरकारने इंधन दरवाढ कमी केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com