agriculture news in marathi, agitation continue for crop insurance, pune, maharashtra | Agrowon

पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न मिळालेले बीड जिल्ह्यातील शेतकरी येथील दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत पीकविमा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा शेतकऱ्यांचा पवित्रा कायम आहे. कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर पडत असून, आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.

पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न मिळालेले बीड जिल्ह्यातील शेतकरी येथील दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत पीकविमा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा शेतकऱ्यांचा पवित्रा कायम आहे. कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर पडत असून, आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.

सध्या जनावरे, घरदार वाऱ्यांवर सोडून रब्बी पेरणीचा, कापूस वेचणीचा हंगाम असतानाही जवळ पैसा नसल्याने पुण्यातील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे दार सोडण्यास शेतकरी तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या विमा कंपनीसोबत आज झालेल्या चर्चेत समाधानकारक निष्कर्ष निघाला नाही. या चर्चेत कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख पी. एस. मूर्ती यांनी शेतकऱ्यांना पीकविमा देणे हे कायदेशीररीत्या बंधकारक आहे, असे मान्य केले. परंतु, अद्याप बीड जिल्ह्यातील चाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१८ मधील विमा देण्यात आला नाही. या आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी विमा कंपनी अशीच असंवेदनशील वागत असल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बीड जिल्हा किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे यांनी दिला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...