agriculture news in marathi, agitation for crop insurance, akola, maharashtra | Agrowon

अकोट तालुक्यातील केळी उत्पादकांचा पीकविम्यासाठी ठिय्या

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

अकोला  ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळी उत्पादकांनी केळीच्या नुकसानीचा विमा तातडीने मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १५) न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या येथील कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्यांबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली.

अकोला  ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळी उत्पादकांनी केळीच्या नुकसानीचा विमा तातडीने मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १५) न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या येथील कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्यांबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली.

जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी २०१८-१९ या हंगामात केळी पिकाचा विमा काढला आहे. या विम्याचा क्लेम कालावधी संपून बरेच दिवस झाले. या हंगामात शेतकऱ्यांचे गारपीट, वादळी वारा तसेच उष्णतेमुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या कंपनीकडे विमा उतरविण्यात आला त्यांच्याकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही. विम्याचा लाभ न मिळाल्याने शुक्रवारी अकोट तालुक्यातील पणज, बोचरा व इतर गावांमधील प्रदीप ठाकूर (सरपंच), मनोज बोचे, कैलास बारब्दे, विकास देशमुख, पंढरी राऊत, केशव जायले, ज्ञानेश्‍वर जायले, प्रमोद शेळके, मधुकर जायले, प्रदीप जायले, अंकुश जायले, अनिल रोकडे, संतोष जायले, गजानन सावरकार, प्रवीण शेंडे, मंगल मालवे, विजय बरदे, पिंटू जायले, रवी जायले, संतोष पंडित, राजेंद्र गवई आदी शेतकरी कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी दुपारपासून कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत ठोस आश्वासन कंपनीकडून मिळत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकरी विकास देशमुख यांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. 


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...