agriculture news in Marathi, agitation for crop insurance, Maharashtra | Agrowon

पीक विम्यासाठी भजन-भोजन आंदोलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

औरंगाबाद : पीक विमा परतावाप्रकरणी सातत्याने कृषी विभाग, विमा कंपनी कार्यालय व जिल्हा प्रशासनाकडे न्यायासाठी याचना करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अखेर सोमवारी (ता. १०) औरंगाबादच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठाण मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र समोर ठेवून भजन व त्याच ठिकाणी भोजन करत याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, जनक्रांती संघटना आदींच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. 

औरंगाबाद : पीक विमा परतावाप्रकरणी सातत्याने कृषी विभाग, विमा कंपनी कार्यालय व जिल्हा प्रशासनाकडे न्यायासाठी याचना करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अखेर सोमवारी (ता. १०) औरंगाबादच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठाण मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र समोर ठेवून भजन व त्याच ठिकाणी भोजन करत याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, जनक्रांती संघटना आदींच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. 

एकीकडे दुष्काळाच्या झळा बसत आहेत; तर दुसरीकडे विमा रक्कम मिळाली असती तर आधार झाला असता. मात्र तीही न मिळाल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. ऑनलाइन विमा भरण्याची सूचना, मात्र ज्यांनी तसा विमा भरला त्यांना परतावा नाही. उलट ज्यांनी ऑफलाइन विमा उतरविला त्यांना विमा मिळतो, हा काय प्रकार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

विमा परताव्यासाठी विमा वितरण कंपनी कार्यालय, कृषी विभागाचे कार्यालय, जिल्हा, तालुका प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही उपयोग झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विमा परताव्यात कंपन्यांची मनमानी सुरू असून, विमा उतरविण्याचा सल्ला देणाऱ्या कृषी विभागाचा त्यांच्यावर अंकुश नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे विमाप्रश्नी शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच भजन - भोजन आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत भजन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

इफ्को टोकियो कंपनीचे प्रतिनिधीही त्यांच्यासोबत होते, परंतु विमा उतरविणाऱ्या सीएससी सेंटरच्या प्रमुखांनी चर्चेसाठी येणे का टाळले, यासह विमा परताव्यातील अनेक रंजक किस्से कागपत्रासह डॉ. मोटे व विमा कंपनीच्या प्रतिनिधींसमोर मांडत शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. 

मनसेचे अण्णासाहेब जाधव, ‘अन्नदाता’चे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे भाई महेश गुजर आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकरी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते. 


इतर अॅग्रो विशेष
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...