पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावर

पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावर
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावर

पुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय राहणार नाय!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत पीकविमा नाकारणाऱ्या कंपन्यांनो, सावधान’, असा इशारा देत शिवसनेने प्रचंड शेतकऱ्यांसमवेत येरवडा येथील बजाज अलियांझ या कंपनीवर धडक दिली. येत्या १५ दिवसांत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम न दिल्यास पुन्हा शिवसेना स्टाइलने आंदोलनाचा इशारा दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिकात्मक धडक मोर्चा बुधवारी (ता. १७) काढण्यात आला. या वेळी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक, जलसंधारणमंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, ओमराजे निंबाळकर, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार शरद सोनवणे, सुरेश गोरे, बाळा कदम, सत्यवान उभे, मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, राजेंद्र काळे, माउली खटके, गजानन चिंचवडे, सुनील भोसले आदी उपस्थित होते. या वेळी विमा कंपन्यांची प्रतिकात्मक तिरडी काढून निघालेल्या या मोर्चात शेतकरी बैलगाड्यासह आले होते. 

जलसंधारणमंत्री शिवतारे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची पीकविमा ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी दीड ते दोन टक्के विम्याची रक्कम घेतली जाते. मात्र, कंपन्या केंद्र, राज्य व शेतकरी अशा तिघांची फसवणूक करत आहे.

इफ्को टोकिओ विमा कंपनीचे सचिन सुरवसे म्हणाले, शेतकऱ्यांकडून कंपनीला चौदाशे ८० कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये कंपनी काम करते. आजपर्यंत कंपनीने ५२४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. अंतिम यादी झालेली नसल्याने आणखी ९०० कोटी रुपये शिल्लक आहेत. यादी अंतिम झाल्यानंतर पुढील विमा रक्कम देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

बजाज अलियांझचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल म्हणाले की, कंपनीकडे ३५ लाख शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला आहे. त्यापैकी पाच लाख २८ हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत २२८ कोटी रुपये दिले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com