agriculture news in marathi agitation for crop insurance pune maharashtra | Agrowon

थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात मोर्चा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

विम्याची रक्कम देण्यासंबधीची चर्चा विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी झाली आहे. काही त्रुटी असल्या तरी तपासायला वेळ लागत आहे. त्यामुळे लवकरच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.
- सुहास दिवसे, कृषी आयुक्त.

पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची रक्कम मिळालीच पाहिजे, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत मंगळवारी (ता. १९) अखिल भारतीय किसान सभेने कृषी आयुक्त कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढला.

दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून पीकविम्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेने मंगळवारी वाकडेवाडी येथील कंपनीच्या कार्यालयावरून कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कॉम्रेड अजित अभ्यंकर, किसान सभेचे जिल्हा समितीचे सदस्य अॅड. अजय बुरांडे, बीड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, अॅड. नाथा शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. 

या वेळी किसान सभेच्या वतीने तुटपुंज्या नुकसानभरपाईचे गुंठ्याला ८० रुपयांचे पाकीट पंतप्रधान, राज्यपाल आणि कृषी आयुक्तांना देण्यात आले. अॅड. अजय बुरांडे म्हणाले, की विमा कंपनी केवळ सीएससी सेंटरने केलेल्या चुकीमुळे विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यासंदर्भात कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे मागणी केली आहे.   
 


इतर ताज्या घडामोडी
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...
१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
रत्नागिरीत वाऱ्यांसह ढगाळ वातावरण;...रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
पाणी शुद्धीकरणासाठी नॅनो...अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि...
ढगाळ हवामानामुळे फळबाग उत्पादक धास्तावलेपुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने...
परभणी : दोन हजारांवर शेतकऱ्यांना...परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप...
औरंगाबाद विभागात १६ कारखान्यांना गाळप...औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर...
बदलत्या हवामानामुळे पिकांवरील परिणामाचा...सोलापूर ः सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचा...
पुणे जिल्ह्यात कांदा रोपांच्या दरात वाढपुणे  ः वाढलेल्या कांदा दरामुळे पुणे...
मधुक्रांती प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभनाशिक  : मधमाशीपालन या विषयावरील ‘मधुक्रांती...
गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन करताना...पुणे  : गाय, म्हशीला कृत्रिम रेतन करताना...
कलम केलेल्या द्राक्ष बागेमध्ये करावयाची...द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध...
जामखेड पालिकेने बाजार समितीला ठोकले टाळेजामखेड, जि. नगर ः नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल बियाणे...सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ९१२...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्तपुणे  : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी...
इथेनॉलनिर्मिती, मिश्रणासाठी बनवले नवे...वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी...