agriculture news in marathi, agitation for debt recovery issue, nashik, maharashtra | Agrowon

`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या आंदोलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे. जिल्हा बँकेवर ज्यांची सत्ता आहे, त्यांचेच राज्यात सरकार आहे. सहकारमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे मदत मागावी, याबाबत जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे आमचा आक्रोश मांडावा अन् शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याकडे केली. 

नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे. जिल्हा बँकेवर ज्यांची सत्ता आहे, त्यांचेच राज्यात सरकार आहे. सहकारमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे मदत मागावी, याबाबत जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे आमचा आक्रोश मांडावा अन् शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याकडे केली. 

जिल्हा बँकेकडून सुरू असलेले शेतीलिलाव आणि सक्तीची कर्जवसुली थांबवण्यासाठी जिल्हा बँकेसमोर सोमवारी (ता. १५) ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी बॅंकेच्या जुना आग्रा रोडवरील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. नंतर पोलिस प्रशासन व जिल्हा बँकेच्या पदाधिकऱ्यांनी मुख्य सभागृहात त्यांना म्हणणे मांडण्यासाठी पाचारण केले. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, संचालक संदीप गुळवे, माजी आमदार व ज्येष्ठ संचालक शिरीष कोतवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे आदी उपस्थित होते. 

‘स्वाभिमानी’चे युवक प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले म्हणाले, की आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आलो आहोत; विरोध करण्यासाठी नाही. आमच्या व्यथा मांडत आहोत. बँकेने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकरी जगवावा आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी. आमच्या संघटनेने सातत्याने भूमिका मांडल्या, जिल्हा बँकेकडे आक्रोश केला. मात्र आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही. शासनाने दुष्काळग्रस्त मंडळे घोषित केली. तेथे कर्जवसुली थांबविण्यात आलेली नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना जगवा व योग्य पद्धतीने वसुलीचे धोरण ठरवा, अशी मागणी बँकेच्या अध्यक्षांकडे केली. बँकेने न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

बँकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसमोर बँकेची वस्तुस्थिती मांडली. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी मध्यस्थी करत सहकार टिकला तर शेतकरी टिकेल, आंदोलन करा मात्र बँकेला सहकार्य करा अशी विनंती केली. यावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी सर्व बाजू ऐकून घेत शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवू देऊ अन शेतकऱ्यांना सहकार्य करू असे आश्वासन दिले. 

‘बँकेचे अधिकारी दादागिरी करतात’
शेतकऱ्यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळत नाही. आमच्या शेतीमालाला भाव नाही. आम्ही पैसे भरणार आहोत; मात्र मुदत द्या, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. बँकेच्या कामकाजाबाबत आल्यानंतर काही अधिकारी दादागिरी करतात, अरेरावीची भाषा वापरतात, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दिला. काही थकीत कर्जदारांनी कागदपत्रे सादर करून बँकेच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, कुबेर जाधव, नाना बच्छाव, ‘प्रहार’चे विनोद पाटील आदी उपस्थित होते. 


इतर बातम्या
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...