Agriculture news in marathi The agitation in Delhi is hampered | Agrowon

दिल्लीतील आंदोलन अडते पुरस्कृत : हर्षवर्धन पाटील

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

 बाजार शुल्क पंजाब आणि हरियाणामध्ये ८ रुपयांपर्यंत आहेत. हे बाजार शुल्क आता बाजार समित्यांना आकारता येणार नसल्याने अडते आणि बाजार समित्यांनी पुरस्कृत केले आहे, असा आरोप भाजप नेते,  हर्षवर्धन पाटील यांनी केला.

पुणे  : महाराष्ट्रामध्ये बाजार शुल्क हे ५० पैसे ते एक रुपया घ्यावा, असा कायदा आहे. मात्र हेच बाजार शुल्क पंजाब आणि हरियाणामध्ये ८ रुपयांपर्यंत आहेत. हे बाजार शुल्क आता बाजार समित्यांना आकारता येणार नसल्याने अडते आणि बाजार समित्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांनी आंदोलन पुरस्कृत केले आहे, असा आरोप भाजप नेते,  माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता.१४) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. तर या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे देखील पाटील म्हणाले. 

भाजपच्या वतीने केंद्राच्या सुधारित कृषी आणि पणन कायद्यांच्या समर्थनार्थ देशभरात ७०० पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. या मधील पुणे शहर आणि जिल्ह्याची पत्रकार परिषद पाटील यांनी घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते वासुदेव काळे आदी यावेळी उपस्थित होते. 

या वेळी पाटील म्हणाले, ‘‘शेतीमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी परकीय गुंतवणूक होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने कायदे केले आहेत. शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य देण्यात आले असून, बाजार समिती कायद्यात कोणताही बदल केलेला नाही. मात्र विरोधक किमान आधारभूत किमतींबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.’’
 


इतर ताज्या घडामोडी
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...
सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ...
आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे...नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध...
‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्गनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्तसांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी...