agriculture news in marathi, agitation for demands of flood affected area, kolhapur, maharashtra | Agrowon

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरात आक्रोश मोर्चा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी विविध पक्ष, संघटनांच्या वतीने बुधवारी (ता. २८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने शेती, छोटे, मोठे उद्योग-व्यवसायांसह विविध घटकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यात सहभागी झाले.

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी विविध पक्ष, संघटनांच्या वतीने बुधवारी (ता. २८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने शेती, छोटे, मोठे उद्योग-व्यवसायांसह विविध घटकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यात सहभागी झाले.

श्री. पाटील म्हणाले, की ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडला. सुमारे ७४७ घरे या पुरामुळे धोकादायक बनली आहेत. ३५० यंत्रमाग कारखाने बाधित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे यांना शंभर कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या पुरामुळे चार लाख लोकांचे स्थलांतर झाले आहे. साखर कारखानदारीचे बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आक्रोश मोर्चा...

 

कोल्हापुरातील शिल्पकार, मूर्तिकारांचे जीवन महापुरामुळे उद्ध्वस्त झाले असून, अनेक मूर्ती व कारखाने पाण्यात गेल्याने या वर्षी त्याचे सावट गणेशोत्सवावर दिसत आहे. अशा मूर्तिकार व शिल्पकारांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळावी. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती महापुरामुळे दहा दिवस बंद ठेवाव्या लागल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल, जीएसटी व प्राप्तिकर न भरल्याने व्यापा­ऱ्यांना विलंब शुल्काचा भुर्दंड होणार आहे. त्यामुळे बिले भरण्यास मुदतवाढ देण्याबरोबरच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी.

विमा कंपन्यांकडून १५ दिवसांत नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर गादी कारखानदार, फर्निचर शोरुम, सराफी पेढ्या, प्रिंटिंग प्रेस, हॉटेल व्यावसायिक, इलेक्ट्रिक उपकरणे विक्रेते आदी व्यापा­यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्याबरोबरच विमा संरक्षण असणाऱ्यांना कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई तातडीने द्यावी. तसेच ज्यांच्याकडे विमा संरक्षण नाही, पण ते नियमित कर भरतात अशांना सरकारी सवलती त्वरीत देण्यात याव्यात, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

श्री. शेट्टी यांनी पूरग्रस्तांची शासन चेष्टा करीत असल्याचे सांगत सरकारच्या धोरणांवर टीका केली. उसासह सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. गुऱ्हाळ घरांचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे पुरामध्ये दगावली आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे तर बेहाल होत आहेत, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, पंचनामे गतीने व्हावेत, अशी मागणी केली. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. 

इतर ताज्या घडामोडी
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...