agriculture news in marathi, agitation in different places in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात विविध ठिकाणी चक्‍का जाम आंदोलन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

औरंगाबाद : दूध दराच्या प्रश्नावरून ‘स्वाभिमानी’ने पुकारलेल्या चक्‍का जाम आंदोलनाच्या आवाहनाला गुरुवारी (ता. १९) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला. रास्ता रोको करत आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी संबंधितांना दिले. शिवाय मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

औरंगाबाद : दूध दराच्या प्रश्नावरून ‘स्वाभिमानी’ने पुकारलेल्या चक्‍का जाम आंदोलनाच्या आवाहनाला गुरुवारी (ता. १९) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला. रास्ता रोको करत आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी संबंधितांना दिले. शिवाय मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

औरंगाबाद जिल्हा
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या ढोरेगाव येथे औरंगाबाद-पुणे महामार्ग रोखत प्रहार शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी संयुक्त चक्का जाम आंदोलन केले. सरकारने शतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असे प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके यांनी सांगितले. या वेळी पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या वेळी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर साळुंके, गुलाम अली, गंगापूर तालुका अध्यक्ष संपत रोडगे, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब शेळके, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख, अरुण रोडगे, प्रहारचे युवा तालुका प्रमुख सुधीर बारे, सतीश चव्हाण, राजू वैद्यसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. पैठण-औरंगाबाद मार्गावरही पैठण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये माउली पाटील मुळे, तालुकाध्यक्ष साबळे, अरुण काळे, आरेफ पठाण, गणेश शेळके, राजू बोंबले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जालना जिल्हा
दूध दरासाठीच्या आंदोलनच्या चौथ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १९) दुपारी वडीगोद्री येथे औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच राजुर शहरातील चौफुलीवर कार्यकार्त्यांनी ठिय्या मंडला.

उस्मानाबाद जिल्हा
उस्मानाबाद जिल्ह्यातील नारंगवाडी पाटी, भोंजा व अणदूर येथे आंदोलन झाले. उमरगा तालुक्‍यातील नारंगवाडी पाटी येथे रस्त्यावर दूध ओतून जवळपास तासभर लातूर-उमरगा मार्ग रोखून धरण्यात आला. परंडा तालुक्‍यातील भोंजा येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दधू ओतून निषेध व्यक्‍त केला. नळदुर्ग येथेही आंदोलन करण्यात आले.
-----------------------------

 

इतर बातम्या
मराठवाड्यातील ९१ मंडळांत पाऊस औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २७२...
आटपाडीतील कालव्याचे अस्तरीकरण पूर्णखरसुंडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यातील ३२...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड : यंदा जिल्ह्यात ७ लाख ५८ हजार ४०५...
‘कृषी संजीवनी’तील कामांची जागतिक...नांदेड : कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील...
आंबेगाव तालुक्यात बटाटा लागवड सुरूमहाळुंगे पडवळ, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्‍...
देशात सेंद्रिय उत्पादन कमीच ः रीता...पणजी: देशात सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक...
`पशुपालन, दुग्धव्यवसायातून होईल उत्पन्न...पुणे  ः केवळ शेतीवर अवलंबून राहून...
यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा...अमरावती  ः सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास...
बाळापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूरला...अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा...
मक्यावरील लष्करी अळीमुळे पोल्ट्री...नाशिक : मागील वर्षी मका उत्पादन कमी झाल्यामुळे...
पुणेगाव कालव्याला गळतीमुळे पिकांचे...नाशिक  : चालू वर्षी पाऊस अधिक झाल्याने...
चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाईपुणे : गाळप हंगाम २०१८-१९ मधील ऊस उत्पादकांची...
सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी...कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून,...
नगर जिल्ह्यात रब्बीत ज्वारी बियाणे...नगर  ः पेरणी करताना पारंपरिक बियाण्यांपेक्षा...
युतीची चिंता आम्हालाही; लवकरच निर्णय :...मुंबई ः राज्यात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने...
मराठवाडा दुष्काळमुक्त करणे हाच आमचा...पुणे  ः देशाची विजेची मागणी पूर्ण झाली असून...
काही भागांत उद्या हलक्या पावसाचा अंदाज पुणे: बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशाच्या...
केंद्रीय पथकाकडून कांदास्थितीचा आढावा...नाशिक : कांदा दरस्थिती, मागणी आणि पुरवठा व नवीन...
राज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर...पुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन...
‘पोकरा’च्या शेळ्या होताहेत गायबअकोला : राज्यातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जात...