दुष्काळी उपाययोजना : काँग्रेसचे बुलडाणा जिल्ह्यात आंदोलन

दुष्काळी उपाययोजनांसाठी आंदोलन
दुष्काळी उपाययोजनांसाठी आंदोलन

बुलडाणा  ः जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती वाढत आहे. परंतु शासन, प्रशासन कोणत्याही ठोस उपाययोजना करीत नसल्याने निषेध म्हणून बुधवारी (ता. १५) काँग्रेसने जिल्ह्यातील तहसील कार्यालयांसमोर आंदोलन केले. यामध्ये काँग्रेस पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी तहसील कार्यालयांसमोर घागरी फोडण्यात आल्या तसेच शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

बुलडाणा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. मात्र दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना राबविल्या जात नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने गावागावांमधून टँकरची मागणी केली जात आहे. परंतु यंत्रणांकडून वेळेत टँकर दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. चाऱ्याचीही व्यवस्था झालेली नाही. मजुरांच्या हातांना काम नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. अशा विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने तालुका स्तरावर आंदोलन केले.

शासनाने तातडीने टँकर सुरू करावेत, जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात, शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी आर्थिक मदत द्यावी, गेल्या हंगामातील पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा दिला जावा आदी मागण्या या वेळी शासनाकडे करण्यात आल्या. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व शासनास मागण्यांचे निवेदन दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com