agriculture news in Marathi agitation due to issue of wheat and rice Maharashtra | Agrowon

गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच संघर्ष पेटला : शरद पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

देशपातळीवर आणि विशेषतः दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने मार्केटींगचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने मार्केटींगचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच गहू व तांदळाच्या भावाच्या संबंधीच्या प्रश्नामुळेही संघर्ष निर्माण झालेला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. तसेच मी कृषीमंत्री असताना पंजाब-हरियानाच्या शेतकऱ्यांना गहू थोडा कमी करा आणि फळं, अन्नधान्य उत्पादन घ्या, असं सांगितलं होतं. पण त्या लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्था (नियाम) व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) तसेच बायर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताहात ते बोलत होते. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री जयंत पाटील, मृदा पाणि जल संवर्धन मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी सचिव एकनाथ डवले, संतोष भोसले, पोर्णिमा तावरे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी केव्हीकेच्या विविध प्रयोगांची व डेअरी फार्मची मान्यवरांनी पाहणी केली. 

‘‘राज्यात भरड धान्याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पंजाब, हरियाणासारख्या राज्यात गहू व तांदूळ पीक प्रचंड प्रमाणात घेतल्यामुळे मातीवर परिणाम झाला आहे. तसेच मार्केटींगवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आज संघर्ष सुरू आहे. देशात ‘नियाम’सारख्या अनेक संस्थांमधून संशोधक मोलाचे काम करत आहेत. मात्र, प्रादेशिक परिस्थिती समोर ठेवायला ते कमी पडतात,’’ असे मत खासदार पवार यांनी व्यक्त केले.
 
‘‘कृषी विज्ञान केंद्राने तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याची लोकांमध्ये वाच्यता करण्यासाठी सप्ताह आयोजित केला आहे. त्यांनी मागील पन्नास वर्षात दूध, फळं, माती व्यवस्थापन, पाणीवापर अशा विविध विषयांवर अभ्यास केला. शेतकऱ्यांना नवे देण्याचा प्रयत्न केला. नियाम, कृषीविद्यापिठांची मदत घेऊन शेतीला आणखी दर्जेदार करावे,’’ असे आवाहन त्यांनी केले. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहापात्रा यांनी ऑनलाइन संवाद साधला. याप्रसंगी सुहास जोशी, हिमांशू पाठक, सारंग नेरकर यांनी संशोधन सादर केले. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

‘ट्रस्ट डेअरी’ उपक्रमाला सुरुवात
पुणे व सातारा जिल्ह्यातील डेअरी उद्योगाचा शाश्वत विकास करण्यासाठी तसेच ग्राहकाला सुरक्षित व स्वच्छ दूधपुरवठा करण्यासाठी 'ट्रस्ट डेअरी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याव्दारे शासन, शेतकरी, दूध संस्थाचालक, दूध प्रक्रिया संस्था यांना जोडण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, सोलीडारीडॅड एशिया, न्युट्रीको, गोविंद मिल्क व बारामती अॅग्रो या पाच संस्थांनी सामंजस्य करार केला. शरद पवार यांच्या हस्ते कराराचे प्रकाशन करण्यात आले.
 


इतर बातम्या
दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
किमान तापमानात वाढ पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय...
देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के...नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही...
‘पीएम-किसान’चे काम करण्यास महसूलचा नकार अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना...
अकोला : अवकाळी, गारपीटग्रस्तांना १७...अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे...
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
अकोला परिमंडळात ४८ तासांत ३४० चोऱ्या उघडअकोला ः अकोला परिमंडळात वीजचोरीच्या घटनांमध्ये...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइनमुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढनगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...