agriculture news in marathi, agitation for electricity bill issue, kolhapur, maharashtra | Agrowon

`वीज दरवाढ कमी न केल्यास पुणे-बंगळूर महामार्ग रोखू`
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जुलै 2019

कोल्हापूर   : कृषिपंपांच्या रखडलेल्या जोडण्या त्वरित द्याव्यात, यांसह कृषी, औद्योगिक, घरगुती, वाणिज्य ग्राहकांच्या वीजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, ही दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेडशनसह अन्य संघटनांनी सोमवारी (ता.१) येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टला पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 

कोल्हापूर   : कृषिपंपांच्या रखडलेल्या जोडण्या त्वरित द्याव्यात, यांसह कृषी, औद्योगिक, घरगुती, वाणिज्य ग्राहकांच्या वीजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, ही दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेडशनसह अन्य संघटनांनी सोमवारी (ता.१) येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टला पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 

माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, आमदार सतेज पाटील, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दसरा चौकातून दुपारी दीड वाजता या मोर्चाला सुरवात झाली. महावितरणच्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चा महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले.

या वेळी प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, की मागण्या मान्य होत नसल्याने आता तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. प्रसंगी मंत्रालयाला घेराओ घालू. आता निर्धार करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची धार येथून पुढे वाढविण्यात येईल. शासनाने कोणतीही आश्‍वासने पाळली नाहीत, हे संतापजनक आहे.

श्री. शेट्टी म्हणाले, की महावितरणने न वापरलेल्या विजेचे बिल शेतकऱ्यांवर लादले आहे. शेतकऱ्याने वीज वापरली, असे सांगून महावितरण आपला भ्रष्टाचार लपवू पाहत आहे. महावितरणने कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या वीजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही दरवाढ कमी करण्याचे आश्वासन भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते. पण, सत्तेवर आल्यापासून राज्यातील कृषिपंपधारक, घरगुती, औद्योगिक ग्राहकांची बेसुमार आर्थिक लूट सुरू आहे. वीजनिर्मिती खर्च, प्रशासकीय खर्च आणि वीजगळती यावर कोणतेही नियंत्रण नाही. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. राज्यातील सर्व शेतीपंपधारक वीजग्राहकांची वीजबिले तपासून दुरुस्त व अचूक करण्यात यावी. यासाठी आता लढा तीव्र करण्यात येईल.

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...