agriculture news in Marathi, agitation for electricity bill, Maharashtra | Agrowon

...अन्यथा रुमण्याचा वापर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी आणि पेन्शन आणि कृषी पंपधारकांवरील अन्यायी वीज दरवाढ रद्द न केल्यास भाजप-शिवसेना सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी रुमण्याचा वापर करावा, असे आवाहन जनता दल (संयुक्त) प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. रेवण भोसले यांनी मंगळवारी (ता. २७) केले. वीज दरवाढीविरोधात येथील आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. या वेळी राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी आणि पेन्शन आणि कृषी पंपधारकांवरील अन्यायी वीज दरवाढ रद्द न केल्यास भाजप-शिवसेना सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी रुमण्याचा वापर करावा, असे आवाहन जनता दल (संयुक्त) प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. रेवण भोसले यांनी मंगळवारी (ता. २७) केले. वीज दरवाढीविरोधात येथील आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. या वेळी राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

महावितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज दरात १ रुपये १६ पैशांवरून १ रुपये ९७ पैसे इतकी दरवाढ केली. ‘महावितरण’ने १४० ते २७४ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ केल्याने पोकळ थकबाकी वाढली आहे. त्यावर कृषी संजीवनी योजना लागू करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही योजना फसली असून, सात लाख शेतकऱ्यांनी ३६१ कोटींची वसुली झाली आहे. म्हणजे एकूण थकबाकीच्या ३.३ टक्के वसुली झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता.

या वेळी अॅड. भोसले म्हणाले, की पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच अन्यायी वीज दरवाढ रद्द केली जात नाही, तोवर राज्यातील शेतकरी स्वस्थ बसणार नाही. शेतकरी संघर्ष करून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत गप्प बसणार नाही. कृषिपंपांची वीजबिले दुरुस्त करावीत आणि मगच वसुली करावी, राज्यभरातील शेतकऱ्यांची पेड पेंडिंग कनेक्शन तातडीने द्यावीत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. या वेळी प्रा. एन. डी. पाटील, प्रताप होगाडे आदींची भाषणे झाली. या आंदोलनात राज्यभरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...