टॉवरच्या भाडेपट्टीसाठी शेतकऱ्यांचे योगा आंदोलन

 टॉवरच्या भाडेपट्टीसाठी शेतकऱ्यांचे योगा आंदोलन
टॉवरच्या भाडेपट्टीसाठी शेतकऱ्यांचे योगा आंदोलन

नागपूर : मोबाईल टॉवरच्या धर्तीवर शेतात उभारल्या जाणाऱ्या वीजवाहक टॉवरची भाडेपट्टी मिळावी, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेकरिता शेतकऱ्यांनी मेहंदी (ता. पारशिवणी) येथे आंतराष्ट्रीय योगदिनी (शुक्रवारी) अभिनव आंदोलन केले. या वेळी शेतातील वीजवाहक टॉवरसमोर योगा करण्यात आला. 

शेतकरी नेते संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोबाईल टॉवर घरावर किंवा खासगी जागेत उभारल्यास संबंधित घरमालकाला त्यापोटी भाडेपट्टी दिली जाते. परंतु शेतात वीजवाहक टॉवर उभारल्यानंतर शेतकऱ्यांना एकदाच तुटपुंजा मोबदला मिळतो. त्याऐवजी शेतकऱ्यांना महिन्याकाठी १५ ते २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी आहे. त्यासोबतच टॉवर व हाय व्होल्टेज वीजवाहक तारा शेतातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, टॉवरबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना वीज कंपनीत नोकरीमध्ये आरक्षण लागू करावे, टॉवर व वीजवाहक तारांमुळे शेतीचे दर कमी झाले; त्याची भरपाई शासनाने द्यावी. देश स्वतंत्र झाल्यापासून शेतात टॉवर असलेल्या शेतकऱ्यांसाठीदेखील नव्या नियमाप्रमाणे भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com