मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
आयात केलेला शेतीमाल परत करावा ः किसान सभा
सातारा : संपूर्ण कर्जमाफी मिळावी, दुधाला आधारभूत दर मिळावा, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, आयात केलेला शेतीमाल परत करावा व देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा; तसेच शेतकऱ्यांनी काढलेल्या लाँग मार्चवेळी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशा मागण्या अखिल भारतीय किसान सभेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.

निवेदनात म्हटले की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दहा ते १२ मार्चदरम्यान नाशिक ते मुंबई असा किसान लाँग मार्च काढण्यात आला होता. या वेळी अखिल भारतीय किसान सभेने संपूर्ण कर्जमाफी, दुधाला आधारभूत दर मिळावा, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार दीडपट हमीभाव मिळावा आदी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या. येत्या तीन महिन्यांत मागण्यांवर निर्णय देऊ, असे शासनाने आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही. उलट सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. पाकिस्तानमधून साखर आयात केल्याने आपल्या साखरेला मागणी नाही. अमेरिकेतून गहू आयात केला आहे, मोझॅम्बिकवरून तूर आयात केली आहे, कर्नाटक व गुजरातमधून दूध आयात केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
हे थांबविण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना परदेशी वस्तू भेट देऊन निषेध नोंदविण्यात आला. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास घेराव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी माणिकराव अवघडे, आनंदी अवघडे, वसंत नलवडे, उदय कदम, अशोक यादव, पोपट देसाई, आनंदा मुळगावकर, दिलीप मोरे आदी उपस्थित होते.
- 1 of 1022
- ››