आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट थांबवावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू होते. पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
The agitation of the farmers' association was suspended after the assurance
The agitation of the farmers' association was suspended after the assurance

पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट थांबवावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू होते. पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कडता, पोटली, पायली, अवाजवी हमाली, छुपी अडत वसूली, बोगस पावत्या, रोख पैसे दिल्यास बटावा रक्कम कापणे असे अनेक गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. प्रशासनाकडे तक्रार करूनही काही उपयोग नसल्यामुळे शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन केले होते.

४ डिसेंबर रोजी पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी जिल्हावार सर्व जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना दोषी आडते व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.एक महिन्यात सर्व बाजार समित्यांतील सर्व गैरव्यवहार तीस दिवसांत बंद करण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेला देण्यात आले. पणन संचालनालयाने दिलेले आश्वासन मान्य करून सायंकाळी धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. पणन संचालकांनी दिलेल्या अश्वासनाप्रमाणे बाजार समितीचे व्यवहार सुधारून शेतकऱ्यांची लूट बंद झाली नाही तर शेतकरी संघटना पुन्हा उग्र आंदोलन छेडले, असा इशारा दिला. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज नाशिक, पुणे, अकोला, लातूर, हिंगोली, परभणी, नगर या जिल्ह्यांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या समारोप प्रसंगी ललित बहाळे, सीमा नरोडे, सतीश देशमुख, लक्ष्मिकांत कौठकर, शंकर पुरकर, अनिल चव्हाण, देविप्रसाद ढोबळे, अॅड. महेश गजेंद्र गडकर, सयाजी मोरे, दीपक शिर्के, प्रशांत पांडे आदी नेत्यांची भाषणे झाली. या आंदोलनास, स्वतंत्र भारत पक्ष, स्वर्ण भारत पार्टी व रयत क्रांती संघटना, शंभू सेनेने जाहीर पाठिंबा दिला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com