कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये धरणे आंदोलन

शासनाची कर्जमाफी फसवी आहे. मुद्दल आणि व्याजाची रक्कम दीड लाखाच्या आत असलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांनी पैसे भरण्यासाठी नोटिसा पाठविलेल्या आहेत. परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिले जात नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहोत. इतर गावातही आंदोलन सुरू केले जाईल. - किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, परभणी.
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये धरणे आंदोलन
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये धरणे आंदोलन

परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे. या कर्जमाफीचा असंख्य शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. कर्जाची परतफेड करूनही नवीन कर्ज दिले जात नाही. बॅंकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्तीसाठी खडकवाडी (ता. मानवत) येथील शेतकऱ्यांनी शनिवारपासून (३१ ऑगस्ट) सुरू केलेले धरणे आंदोलन रविवारीही (ता. १५) सुरू होते. नागरजवळा, सावळी, जंगमवाडी (ता. मानवत) येथील शेतकऱ्यांनीदेखील गुरुवारपासून (ता. १२) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

खडकवाडी (ता. मानवत) येथील शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बॅंकेच्या पाथरी येथील शाखेकडून कर्ज घेतले आहे. राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. परंतु गावातील बहुतांश शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. बॅंकांनी एकरकमी परतफेडीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठविलेल्या आहेत. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांकडे दीड लाखांवरील रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. कर्जाची परतफेड करूनही नवीन कर्ज दिले जात नाही. बॅंकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी खडकवाडी येथील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे

जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून ३१ ऑगस्टपासून गावातील हनुमान मंदिरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु कर्जमुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे रविवारीदेखील (ता. १५) धरणे आंदोलन सुरूच होते. गुरुवारपासून (ता. १२) मानवत तालुक्यातील नागरजवळा, सावळी, जंगमवाडी येथील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com