पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा धार फाटा येथे रास्ता रोको 

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

गोजेगाव, जि. हिंगोली : बॅंका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे संतप्त झालेल्या सावळी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२६) औंढा नागनाथ-जिंतूर राज्य रस्त्यावरील धार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. 

सावळी खुर्द येथील शेतकऱ्यांना डिग्रस कऱ्हाळे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक दत्तक असूनसुद्धा कर्ज देत नाही. तसेच औंढा नागनाथ येथील भारतीय स्टेट बँक शाखा बँक देखील कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे अखेर शेतक-यांनी बुधवारी औंढा नागनाथ-जिंतूर राज्य रस्त्यावर रास्तारोको केला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक विलास आघाव, शिवसेना तालुका उपप्रमुख पांडुरंग नागरे, सरपंच शिवाजी राठोड, उपसरपंच बालाजी आघाव, प्रहारचे तालुका संपर्कप्रमुख दत्तराव दराडे, शंकर आघाव, साहेबराव आघाव, मधुकर जाधव, विष्णू आघाव, संजय खिलारे, माउली सांगळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पाच दिवसांच्या आत पीककर्ज वाटप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com