agriculture news in marathi agitation for farmers demand akola maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात `वंचित`चा आक्रोश मोर्चा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना भरीव मदत मिळावी, कोणताही सर्व्हे न करता एकरी दहा हजार रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना भरीव मदत मिळावी, कोणताही सर्व्हे न करता एकरी दहा हजार रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेले सोयाबीन तसेच कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन, उडीद, मुगाच्या शेंगांना कोंब फुटले होते. ज्वारीचेही अतोनात नुकसान झाले. कापूसही भिजला होता. खरिपात शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. आता हा पैसाही परत करण्याची स्थिती शेतकऱ्यांची राहिलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी दुपारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, वंचितचे आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर हा मोर्चा अडविण्यात आला. येथून एक शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले.

मोर्चामध्ये माजी आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोदे, प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोंडे, प्रा. धैर्यवर्धन फूंडकर, प्रतिभा अवचार आदी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अन्यथा वंचित आघाडी अधिक आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

 

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...