agriculture news in marathi, The agitation of farmers of Kelapur if wild animals are not control | Agrowon

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास केळापूरच्या शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

यवतमाळ : केळापूर तालुक्‍यात वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण व पंचनामे करावेत. त्यासोबतच वन्यप्राण्यापासून होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केळापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

यवतमाळ : केळापूर तालुक्‍यात वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण व पंचनामे करावेत. त्यासोबतच वन्यप्राण्यापासून होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केळापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

उपविभागीय अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आहे. त्यानुसार, अगोदरच नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रातील डुकरेदेखील ग्रामीण भागात सोडली जात आहेत. त्याचाही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, हा प्रकार थांबवावा. नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडून सातबारा, आठ-अ, नकाशा, नुकसानीचे फोटो, पंचनामा, पिकाचे पेरपत्रक, सरपंचाचे प्रमाणपत्र, वनरक्षकाची साक्ष, अशी अनेक कागदपत्रे मागितली जातात. त्यावर सुमारे १ हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होतो. मानसिक त्रास वेगळाच. त्यामुळे ही प्रक्रिया बंद करून सोपी प्रक्रिया राबवावी.

अभय कट्टेवार, सतीश रेड्डी क्‍यातमवार, विनोद बंडेवार, नथ्थुजी बुर्रेवार, नितीन मंचलवार, सतीश भोयर, किसन बुर्रेवार, रूपेश चिंतलवार, उदयभान ताकसांडे, रामभाऊ दांडेकर, चंदू राठोड, अजय राजूरकर, वसंत येमूलवार, वसंत कोहचाडे उपस्थित होते.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...