agriculture news in marathi, agitation of farmers for milk rate,satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या दिवशीही आंदोलन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 जुलै 2018

सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता.१६) सुरू केलेल्या दूध दरप्रश्‍नी आंदोलन जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१८) सुरूच होते. जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) दुधाचे २८.४८ टक्के संकलन झाले. खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडून मुबंईकडे पोलिस संरक्षणात एकूण २७ दुधाचे टॅंकर निघाले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येऊन टॅंकरवर दगडफेक केली, यामध्ये दुधाच्या एका टॅंकरला व पुणे विटा या एस. टी. बसला दगड लागल्याने समोरील काचेचे नुकसान झाले.

सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता.१६) सुरू केलेल्या दूध दरप्रश्‍नी आंदोलन जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१८) सुरूच होते. जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) दुधाचे २८.४८ टक्के संकलन झाले. खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडून मुबंईकडे पोलिस संरक्षणात एकूण २७ दुधाचे टॅंकर निघाले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येऊन टॅंकरवर दगडफेक केली, यामध्ये दुधाच्या एका टॅंकरला व पुणे विटा या एस. टी. बसला दगड लागल्याने समोरील काचेचे नुकसान झाले.

मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील बोगदा ओलाडल्यानंतर एस कॉर्नरवर कोल्हापूरवरून मुंबईकडे पोलिस संरक्षणात एकूण २७ दुधाचे टॅंकर निघाले असता, अज्ञात दोघांनी अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलवरून सातारा बाजूकडे घाटाच्या विरुद्ध दिशेने येऊन दगडफेक केली. यामध्ये दुधाच्या एका टॅंकरला व पुणे विटा या एस. टी. बसला दगड लागल्याने समोरील काचेचे नुकसान झाले. या दगडफेकीतील एस. टी. खंडाळा  पोलिस स्टेशनला आणण्यात आली. यानंतर राज्य राखीव पोलिस दल व खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात बंदोबस्त ठेवला होता.

बुधवारी वडगाव जयराम स्वामी (ता. खटाव) येथे शेतकऱ्यांनी गरजू लोकांना शंभर लिटर मोफत दूध वाटून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. येथील हुतात्मा दूध संकलन केंद्राचे संचालक रंगुनाथ घार्गे आणि मोहन घार्गे यांनी गावातील गरजू लोकांना मोफत दूध वाटून आंदोलनास पाठिंबा दिला. सोनगाव संमत निंब येथील दूध उत्पादक कमलाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दूध वाटप केले. अहिरे येथे ग्रामपंचायत चौकात माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून दूध आंदोलन छडले.

दरम्यान, बुधवारी संध्याकाळपासून या रस्त्यांवरून पुणे मुंबईकडे जाणारे दुधाचे टॅंकर रोखून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा श्री. धायगुडे- पाटील व शेतकऱ्यांनी दिला. वर्णे येथील अष्टपैलू व्यायाम मंडळाने २००० लीटर दूध जमा करून ते तालमीतील लाल मातीत ओतले. नांदगाव (ता. कऱ्हाड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूधाचे टेम्पो अडवून दूध रस्त्यावर ओतले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात दुधाची वाहतूक सुरू करण्यात आली तर तालुक्‍यातील करवडी गावातील शेतकऱ्यांनी दूध डेअरीत न घालता दुधाने आंघोळ करून आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच कोपर्डे हवेली, वडोली निळेश्‍वर येथे अंगणवाडीतील मुलांना दूधवाटप करण्यात आले. जिल्ह्यात बुधवारी सकाळी चार लाख ४१ हजार ४०० लिटर म्हणजेच सरासरीच्या २८.४८ टक्के दूध संकलन झाले.

दूध दर आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस होता. बहुतांशी दूध उत्पादक संस्थाकडून दूध संकलन बंद ठेवण्यात आले. परिणामी सातारा, कराड या प्रमुख शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. तसेच थेट ग्राहकांना दूध घालत असलेल्या शेतकऱ्यांनी रतिबाचे दूध बंद केले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास दूध टंचाई भीषण होण्याची शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ९१ मंडळांत पाऊस औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २७२...
आटपाडीतील कालव्याचे अस्तरीकरण पूर्णखरसुंडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यातील ३२...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड : यंदा जिल्ह्यात ७ लाख ५८ हजार ४०५...
‘कृषी संजीवनी’तील कामांची जागतिक...नांदेड : कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील...
आंबेगाव तालुक्यात बटाटा लागवड सुरूमहाळुंगे पडवळ, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्‍...
देशात सेंद्रिय उत्पादन कमीच ः रीता...पणजी: देशात सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक...
`पशुपालन, दुग्धव्यवसायातून होईल उत्पन्न...पुणे  ः केवळ शेतीवर अवलंबून राहून...
यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा...अमरावती  ः सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास...
बाळापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूरला...अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा...
मक्यावरील लष्करी अळीमुळे पोल्ट्री...नाशिक : मागील वर्षी मका उत्पादन कमी झाल्यामुळे...
पुणेगाव कालव्याला गळतीमुळे पिकांचे...नाशिक  : चालू वर्षी पाऊस अधिक झाल्याने...
चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाईपुणे : गाळप हंगाम २०१८-१९ मधील ऊस उत्पादकांची...
सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी...कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून,...
नगर जिल्ह्यात रब्बीत ज्वारी बियाणे...नगर  ः पेरणी करताना पारंपरिक बियाण्यांपेक्षा...
युतीची चिंता आम्हालाही; लवकरच निर्णय :...मुंबई ः राज्यात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने...
मराठवाडा दुष्काळमुक्त करणे हाच आमचा...पुणे  ः देशाची विजेची मागणी पूर्ण झाली असून...
नाशिकला कांद्याची सर्वसाधारण आवक; दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणाला सोयाबीन ३८०० रुपये प्रतिक्विंटलनागपूर : कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी; तर...
पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती,...मक्यावरील लष्करी अळी (शा. नाव - स्पोडोप्टेरा...