agriculture news in marathi, agitation of farmers, parbhani, maharashtra | Agrowon

दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे आंदोलन सुरू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जानेवारी 2019

परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हा दुष्काळ निवारण संघर्ष समितीतर्फे सोमवारपासून (ता.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. 

दुष्काळ निवारण संघर्ष समितीचे काॅम्रेड राजन क्षीरसागर, माणिक कदम, शेख जाफर, माधुरी क्षीरसागर आदींच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या

परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हा दुष्काळ निवारण संघर्ष समितीतर्फे सोमवारपासून (ता.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. 

दुष्काळ निवारण संघर्ष समितीचे काॅम्रेड राजन क्षीरसागर, माणिक कदम, शेख जाफर, माधुरी क्षीरसागर आदींच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या

  • खरीप हंगाम २०१८ मधील सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद या पिकांची २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई पीकविमा योजनेमध्ये सहभागी शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. दुष्काळग्रस्त शेतक-यांना संपूर्ण पिकांची विमा नुकसानभरपाई देण्यात यावी.
  • जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे रब्बीतील उभी पिके तसेच चारा पिकांच्या उत्पादनासाठी आवर्तन सोडण्यात यावे.
  • माजलगांव प्रकल्पाच्या वरच्या धरणातून सोनपेठ, गंगाखेड तालुक्यातील लाभक्षेत्रात पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • निम्न दुधना प्रकल्पातून दोन आवर्तने तसेच नदी पात्रातील कोल्हापुरी बंधा-यांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • गोदावरी नदीवरील डिग्रस उच्च पातळी बंधा-यातील पाणी पळविण्याचे प्रकार बंद करून लाभक्षेत्रातील शेतक-यांना पाणी वापराचे परवाने देण्यात यावेत.
  • मनरेगाअंतर्गत रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना तत्काळ किमान २०० दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा.
  • दुष्काळग्रस्त भागात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.
  • सर्वाच्या हातांना काम आणि रेशन यासह दुष्काळ निवारणासाठीच्या १३  सुविधांची अंमलबजावणी करावी.
  • दुष्काळग्रस्तांना खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी.

 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...