गोदावरी नदीवरील मुळी बंधारा दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन

परभणी जिल्ह्यात आंदोलन
परभणी जिल्ह्यात आंदोलन

परभणी : गोदावरी नदीवरील मुळी (ता. गंगाखेड) येथील बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी. दुष्काळी उपायोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी गंगाखेड- परभणी राज्य रस्त्यावरील खळीपाटी जवळ शुक्रवारी (ता. १०) दुष्काळ निवारण संघर्ष समितीतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कॅाम्रेड राजन क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. संजय कच्छवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, गोपीनाथ भोसले, शिवाजी कदम, ओंकार पवार, शंकर मोरे, भगवान शिंदे, सुरेश ईखे, सुनील पौळ, शिवाजी जाधव, अॅड. लक्ष्मण काळे, प्रकाश गोरे आदींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.  

दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या

  • मुळी बंधाऱ्यावर उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत. दुष्काळी उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी.
  • पर्यावरण रक्षणासाठी गोदावरी नदी पात्रातून बेसुमार वाळूउपशावर निर्बंध घालावेत.
  • गोदावरी नदी पात्रात पिण्यासाठी व जनावरांसाठी तत्काळ पाणी सोडण्यात यावे.
  • जनावरांच्या संख्येनुसार प्रत्येक गावात चारा छावण्या सुरू कराव्यात. 
  • स्थलांतर थांबविण्यासाठी गावोगावी रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत.
  •  गरीब, शेतकरी, शेतमजूर शिधापत्रिकाधारकांना सरसकट स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावे.
  • खरीप हंगामासाठी पीक कर्जवाटप सुरू करावे.
  • अशास्त्रीय उंबरठा उत्पादनावर आधारित पीक कापणी प्रयोग रद्द करून दुष्काळ नियमाप्रमाणे ५० टक्के पीकविमा परतावा अदा करावा.
  • शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल एफआरपीनुसार अदा करावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com