बुलढाणा : चारा छावणीसाठी तहसीलमध्ये आंदोलन

आंदोलन
आंदोलन

बुलढाणा ः शासनाचे आदेश असतानाही चारा छावण्या सुरू न झाल्याने या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खामगाव तहसील कार्यालयात झोपा काढो आंदोलन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्वात झालेले आंदोलन तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर काही वेळाने मागे घेण्यात आले.  चारा छावण्या उघडण्यासाठी वारंवार निवेदने देऊन, उपोषण करूनही शासन त्याची दखल घेत नाही. चारा छावण्या कधी सुरू करता हे विचारण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात दाखल झाले. परंतु, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनात झोपा काढो आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ उडाली. कार्यकर्ते कार्यालयात झोपल्याने एकच धांदल उडाली. जोपर्यंत चारा छावण्या मिळणार नाही तोपर्यंत येथेच झोप काढू, असा इशारा देण्यात आला. यामुळे प्रशासनाची एकच पळापळ झाली.

लेखी आश्वासन ‘स्वाभिमानी’ने केलेल्या आंदोलनाची दखल घेत खामगाव तहसीलदारांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चारा छावणीचा आदेश उद्या मिळणार असून त्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाईल. चारा छावणी उभारण्यासाठी आमसरी येथील गौरक्षण संस्थांनचा प्रस्ताव तहसील कार्यालयात आलेला असून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदारांनी आंदोलकांना लेखी स्वरूपात दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com