Agriculture news in Marathi Agitation in front of CCI office in Akola | Agrowon

अकोल्यात सीसीआयच्या कार्यालयासमोर आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

अकोला ः कापूस, कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २२) ‘कांद्याच्या माळ गळा आणि मूठभर कापूस जाळा’ असा नारा देत आंदोलन केले. शेतकरी संघटनेच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

अकोला ः कापूस, कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २२) ‘कांद्याच्या माळ गळा आणि मूठभर कापूस जाळा’ असा नारा देत आंदोलन केले. शेतकरी संघटनेच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

शासनाने शेतकऱ्यांच्या कापूस व कांद्याची कोंडी फोडावी या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जाव लागत आहे. कापसाचे ढीग शेतकऱ्यांच्या घरात पडून आहेत. आगामी हंगाम तोंडावर आला आहे. व्यापारी या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. किमान आधारभूत किमतीवर शासनाची खरेदी चालू आहे पण त्याची गती अतिशय संथ आहे.

या गतीने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून घेण्यास सहा ते आठ महिने लागणार आहेत. सरकारने खरेदी केंद्र वाढवून जलद गतीने कापूस खरेदी करावा. तसेच सीसीआयला लांब, मध्यम व आखूड धाग्याचा कापूस खरेदी करण्याचा आदेश द्यावा. जर सरकार कापूस खरेदी करू शकत नसेल तर भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा नाफेडमार्फत शासनाने दोन हजार रुपये किंटलने खरेदी करावा. या मागण्यांसाठी, कांदा व कापसाची कोंडी फोडण्यासाठी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत सीसीआयच्या अकोला कार्यालयासमोर कापूस जाळला.

यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी संघटनेचे धनजंय मिश्रा, विलास ताथोड, डॉ. निलेश पाटील व अविनाश नाकट हे सहभागी झाले होते. जिल्ह्यात तालुका पातळ्यांवरही आंदोलन झाले. तेल्हारा तालुक्यातील तळेगांव डवला येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. विजय ताथोड यांच्या नेतृत्वात शिवहरी पाटील ताथोड, मनोहर पाटील ताथोड, गणेशराव डिगोळे, तोताराम पाटील ताथोड, अनंता ताथोड, राम ताथोड, विठ्ठल ताथोड आणि इतर शेतकरी सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...