एफआरपीसाठी रास्ता रोको

एफआरपीसाठी आंदोलन
एफआरपीसाठी आंदोलन

माजलगाव, जि. बीड: शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करून पैसे देण्यास विलंब लागत असल्याने हे पैसे देण्यात यावेत, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने ऊस गाड्या अडवित सोमवारी (ता. २५) परभणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  २०१६ - १७ वर्षीच्या लोकनेते सुंदरराव सोळंके, छत्रपती व जय महेश साखर कारखान्याने सहाशे रुपये प्रतिटन कमी दिले होते ते ६०० रुपये व्याजासहित देण्यात यावेत, २०१७ - १८ चे २५० रु. माजलगाव कारखान्यापेक्षा ५० रुपये प्रतिटन देण्यास लेखी कबूल करणऱ्या जय महेश कारखान्याने काही लोकांना १८०० रुपये काहींना २०५० रुपये असा दुजाभाव केला, ज्यांना २०५० मिळाले नाहीत त्यांना २५० रुपये तात्काळ देण्यात यावेत, यावर्षी तिन्ही कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उस बिले द्यावी, तिन्ही साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी परभणी फाटा येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली उसाच्या गाड्या अडवित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.  दरम्यान, या रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती तर आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com