agriculture news in marathi, agitation of gramsevak for several demands,akola, maharashtra | Agrowon

ठोस तोडग्याअभावी ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरूच
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

अकोला  ः राज्यात २२ ऑगस्टपासून ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू असून, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. दरम्यानच्या काळात मुंबईत बैठका झाल्या, मात्र आश्‍वासन नको आदेश काढा, या मागणीवर ग्रामसेवक संघटना ठाम राहिल्याने आंदोलनाचा कालावधी वाढत चालला आहे.

अकोला  ः राज्यात २२ ऑगस्टपासून ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू असून, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. दरम्यानच्या काळात मुंबईत बैठका झाल्या, मात्र आश्‍वासन नको आदेश काढा, या मागणीवर ग्रामसेवक संघटना ठाम राहिल्याने आंदोलनाचा कालावधी वाढत चालला आहे.

राज्यात कार्यरत असलेल्या २२ हजार ग्रामसेवकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने गावपातळीवर समकक्ष काम करणाऱ्या राज्य शासन, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ग्रामसेवकांना अधिक काम असतानाही इतरांच्या तुलनेत वेतनात असमानता आहे. पदोन्नतीची संधी मिळत नाही. सोबतच इतर फायदेसुद्धा मिळत नाहीत. इतर विभागांच्या अनेक कामांसाठी ग्रामसेवकांवर सक्ती केली जाते. ग्रामसेवक तणावग्रस्त होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत, अशा विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने ९ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडले. त्यानंतर २२ ऑगस्टपासून राज्यात सर्वत्र कामबंद आंदोलन सुरू केले. ग्रामपंचायतींच्या रेकाॅर्डच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत.

ग्रामसेवकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आजपर्यंत मंत्र्यांसह सचिवस्तरावर बैठका झाल्या. मागण्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र ग्रामसेवकांची संघटना यापूर्वीचा अनुभव पाहता आदेश काढण्याच्या मागणीवर ठाम राहिलेली आहे. परिणामी, आंदोलनाबाबत आजवर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. या आंदोलनाचा ग्रामपंचायतींच्या कामांवर परिणाम झाला आहे. आंदोलनाची झळ नागरिकांना बसत असून, विविध प्रकारचे दाखले मिळेनासे झाले आहेत. 
 
या आहेत प्रमुख मागण्या

  • समान काम-समान दाम.
  • समकक्ष पदे-समान वेतनश्रेणी.
  • ग्रामसेवकांच्या शैक्षणिक अर्हतेत बदल करावा. लोकसंख्या आधारित ग्रामविकास अधिकारी पदात वाढ करावी.
  • वेतनत्रुटी दूर करणे. 
  • २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 
  • आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ द्यावी. 
  • ग्रामसेवक युनियनचे महाअधिवेशन घ्यावे.
  • अतिरिक्त कामे कमी करावीत.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...