agriculture news in marathi, agitation of kisan sabha for milk rate, pune, maharashtra | Agrowon

दूध दरप्रश्नी किसान सभेचे राज्यभरात रास्ता रोको
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

पुणे : १ जूनचा संप, शेतकरी लाॅंग मार्चदरम्यान मान्य मागण्यांची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमुक्ती व दूध तसेच शेतमालाला रास्त दर मिळावा, या मागणीसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (ता. १०) राज्यातील २१ जिल्ह्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते, अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

पुणे : १ जूनचा संप, शेतकरी लाॅंग मार्चदरम्यान मान्य मागण्यांची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमुक्ती व दूध तसेच शेतमालाला रास्त दर मिळावा, या मागणीसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (ता. १०) राज्यातील २१ जिल्ह्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते, अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

शेतकरी संपाला एक जून रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण मागण्यांच्या पूर्ततेसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, प्रहार, भूमिपुत्र शेतकरी संघटना, शरद जोशी विचार मंच, लाखगंगा आंदोलन, भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन, शेतकरी कृती समिती, पीपल्स हेल्पलाइन व भारतीय कृषक समाजासह विविध संघटना सामील झाल्या होत्या.

आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने दूध दरप्रश्नी शासनादेश काढला आहे. मात्र, काढण्यात आलेल्या शासनादेशात अनेक संदिग्धता आहेत. सहकारी दूध संघांनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आहे. खासगी दूध कंपन्यांना हा आदेश लागू नाही. लॉंग मार्चच्या मान्य मागण्यांचीही सरकारने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही, या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.  

एक जून ते दहा जून या कालावधीत झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार असून, यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सर्व मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे संघर्ष समितीने जाहीर केले आहे.

रविवारच्या आंदाेलनात डॉ. अशोक ढवळे,  आमदार बच्चू कडू,  आमदार जे. पी. गावित,  किसन गुजर,   डॉ. अजित नवले,   संतोष वाडेकर, अनिल देठे, विठ्ठल पवार, धनंजय धोर्डे, अशोक सब्बन,   कारभारी गवळी, राजाराम देशमुख हे सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...