जमीन अधिग्रहणाविरोधात चंद्रकांतदादांच्या कार्यालयापुढे ठिय्या

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर  : रत्नागिरी-नागपूर व विजापूर-गुहागर महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाच्या विरोधासह देवस्थान इनाम वर्ग तीन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ११) महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

या वेळी विविध शेतकरी प्रतिनिधींनी या कामाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. मोर्चा सांगलीहून १२ वाजेच्या सुमारास ताराराणी पुतळ्याजवळ दाखल झाला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. कार्यालयाजवळ आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडवला

‘रत्नागिरी-नागपूर व विजापूर-गुहागर महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जाहीर केल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपात निवेदने देऊन विरोध केला आहे. याबाबत सरकारने कोणत्याही प्रकारची सुनावणी न घेता, जमिनी अधिग्रहित केल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवत जमिनींचे मूल्यांकनही केले असून महामार्गाचा कोणताही आराखडा संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलेला नाही.

भूमीअधिग्रहण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, सांगली-कोल्हापूर राज्यमार्गाचे अधिग्रहण झाल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिग्रहण करू नये, अधिग्रहीत जमिनीवरील घरे, झाडे, विहिरी, बोअरवेल्स या सर्वांची बाजारभावाच्या पाचपटीने मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर करावे, महामार्गाचा झालेला चुकीचा सर्व्हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व्हे करावा. देवस्थान इनाम जमिनींचेही प्रश्न देवस्थान इनाम वर्ग ३ ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून समस्या कायम आहेत. ही जमीन कसणाऱ्यांच्या नावावर झाली पाहिजे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. यावेळी उदय नारकर यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com