मराठा आरक्षणासाठी पुण्यात चक्री उपोषण सुरू

मराठा आरक्षणासाठी चक्री उपोषण
मराठा आरक्षणासाठी चक्री उपोषण

पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. २०) बेमुदत चक्री उपोषणाला सुरवात झाली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे पाटील यांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले आहेत. चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. आंदोलन शांततेने, संयमाने व शिस्तीने करावे, गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये, प्रक्षोभक घोषणा, भाषणे करू नये, आंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकाव्या, अनुचित प्रकार करणाऱ्यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशी वर्तणूक ठेवून कार्यकर्त्यांनी बेमुदत चक्री उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com