वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे आंदोलन

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला आजपासून (ता.१६) सुरुवात होणार आहे. वरुड येथे रविवारी (ता.१५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात नागपूरला जाणाऱ्या दूध टॅंकरची रविवारी (ता.१५) जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन अधिक हिंसक होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

दूध उत्पादकांच्या खात्यात थेट पाच रुपयांचे अनुदान जमा करावे, या मागणीसाठी सोमवारपासून (ता.१६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. विदर्भातदेखील हे आंदोलन तितक्‍याच तीव्रपणे उभारले जाईल; या माध्यमातून विदर्भातील दुग्धोत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल, अशी घोषणा यापूर्वीच खासदार शेट्टी यांनी केली होती. पूर्वनियोजित हे आंदोलन सोमवार (ता.१६) मध्यरात्रीपासून सुुरू होणार होते. मात्र, विदर्भात बारा तासांपूर्वीच या आंदोलनाचे पडघम वाजण्यास सुरवात झाली.

संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात वरुड येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूरला दूध घेऊन जाणारा टॅंकर थांबविला. त्यानंतर चालक व क्‍लिनरला उतरण्यास सांगत टॅंकरला आग लावण्यात आली. संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील तारसा येथे आंदोलन होईल, तर यवतमाळमध्ये देखील मनीष जाधव यांनी आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. अकोला जिल्ह्यात चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वात, तर बुलडाणा जिल्ह्यात व राज्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे तीव्र पडसात उमटण्याचे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com