दुधाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा महादेवाला दुग्धाभिषेक

दुधाला दर मिळत नसल्याने  शेतकऱ्यांचा महादेवाला दुग्धाभिषेक
दुधाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा महादेवाला दुग्धाभिषेक

नगर  ः दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याची सरकारने फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात दुधाला दर दिला जात नाही. दुधाला दर देण्याबाबत सुबुद्धी मिळावी, यासाठी सालवडगाव (ता. शेवगाव) येथे शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री महादेवाला दुधाचा अभिषेक करून संताप व्यक्त केला. सरकारने दूधदराबाबत लवकर निर्णय घेतला नाही, तर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

राज्यासह नगरमधील अनेक भागांत दुग्धव्यवसायाला प्राधान्य दिले जाते. सध्या दुष्काळाने होरपळ सुरू आहे. तरीही शेतकऱ्यांनी काटकसर करून दुग्धव्यवसाय सुरू ठेवला आहे. दुभती आणि विनादुभती जनावरे पदरमोड करून सांभाळली आहेत. दुष्काळाचा दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दुधाला २७ रुपये प्रती लिटर दर देणार असल्याचे सरकार फक्त सांगतेय, प्रत्यक्षात १८ ते २० रुपये प्रती लिटर दरानेच विक्री करावी लागत आहे. मध्यंतरी दूध दरासाठी आंदोलन झाले होते. त्यानंतर काही काळ अनुदान दिले. आता मात्र अनुदानही बंद आहे. त्यामुळे भर दुष्काळात शेतकरी त्रस्त आहेत. अशा काळातही दुधाला दर मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सालवडगाव येथे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्या नेतृत्वाखाली श्री महादेवाला दुग्धाभिषेक करून संताप व्यक्त केला. 

या वेळी अण्णासाहेब रुईकर, अनिल लांडे, बंडोपंत थोरात, दिनकर रुईकर, देविदास औटी, आबासाहेब टेकाळे, साहेबराव म्हस्के आदीसह शेतकरी सहभागी झाले होते. शासनाने दूधदराबाबत तातडीने निर्णय घेतला नाही तर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे या वेळी शेतकऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com