agriculture news in Marathi agitation for milk rate in state Maharashtra | Agrowon

दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गार

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

 दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व महायुतीमधील घटक पक्षांनी दूध दरवाढीसाठी शुक्रवारी (ता.१) पुकारलेल्या महाएल्गार आंदोलनाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. 

पुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व महायुतीमधील घटक पक्षांनी दूध दरवाढीसाठी शुक्रवारी (ता.१) पुकारलेल्या महाएल्गार आंदोलनाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. संतप्त शेतकऱ्यांनी अनेक भागांमध्ये रस्त्यावर दूध ओतून संताप व्यक्त केला. गावोगावी चावडीवर दुधाचे अभिषेक केले गेले. रस्त्यावर टायर जाळून दुधाची वाहने अडविण्याचे प्रकार झाले. पोलिसांनी काही तालुक्यांमध्ये आंदोलकांची धरपकड केली. यामुळे राज्यात दूध पुरवठा विस्कळीत झाला.

शेतकऱ्यांच्या खात्यात दूध खरेदीपोटी प्रतिलिटर दहा रुपये अनुदान जमा करावे व दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, अशा मुख्य मागण्या आंदोलनकर्त्यांच्या होत्या. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही तालुक्यांमध्ये आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.  शेतकरी संपासाठी गाजलेलेल्या पुणतांबा येथे बळिराजाच्या मूर्तीला अभिषेक घातला गेला. दूध उत्पादकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या वैजापूरच्या लाखगंगा येथे शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी गणपतीला दूध अभिषेक घालून आंदोलन केले. 

संघर्ष समितीचे प्रमुख डॉ.अजित नवले यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नगरच्या अकोले भागात दगडाला दुधाचा अभिषेक घातला. किसान सभेचे अध्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अशोक ढवळे, आ. विनोद निकोले यांनी डहाणूत आंदोलन छेडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नायगाव (ता.मावळ) येथे आंदोलन केले.

माजी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीवर तसेच चंद्रभागा नदीत उतरून दूध अभिषेक आंदोलन केले. रयत क्रांतीचे नेते व माजीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी इस्लामपुरात आंदोलन केले. दुसऱ्या बाजूला श्री. खोत यांनी नामदेव पायरीवर आंदोलन केले.

आंदोलन फसल्याने ते पिसाळलेतः शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनात भाग घेतला नाही. ‘‘आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. सदाभाऊ खोत यांचे हे आंदोलन फसले आहे. शेतकऱ्यांचा सहभाग नसल्याने फज्जा उडालेले आंदोलन पाहून ते पिसाळले. हे आंदोलन केंद्राच्या, राज्याच्या की शेट्टीच्या विरोधात होते ते आधी ठरवा. पण त्याआधी प्रसिद्धीसाठी भ्रमिष्ठासारखे कोणालाही जबाबदार धरू नये,’’ अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी खोतांवर केली.

आंदोलनाच्या घडामोडी

  • दूध दरवाढीसाठी विरोधक रस्त्यावर
  • आंदोलन फसल्याचा राजू  शेट्टींचा दावा
  • महायुतीच्या नेत्यांची विविध जिल्ह्यात धरपकड
  • टायर जाळून,दूध ओतून आंदोलकांचा संताप 
  • गावोगावी शेतकऱ्यांनी केला दुधाचा अभिषेक
  • दूध उत्पादक संघर्ष समितीचे चावडीवर आंदोलन 
  • पुणतांब्यामध्ये बळिराजाच्या मूर्तीला अभिषेक

इतर अॅग्रो विशेष
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...