agriculture news in Marathi agitation for minimum support price Maharashtra | Page 2 ||| Agrowon

हमीभावासाठी अंगाला हळद लावून आज आंदोलन : भूमिपुत्र शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

हळदीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह हळद उत्पादकांच्या समस्या सरकारने सोडवाव्या यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २५) हळद अंगाला लावून आंदोलन केले जाणार आहे.

वाशीम: हळदीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह हळद उत्पादकांच्या समस्या सरकारने सोडवाव्या यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २५) हळद अंगाला लावून आंदोलन केले जाणार आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तातडीने निवेदन पाठवला आहे. 

हळद हे महाराष्ट्रातील प्रमुख मसाले पीक आहे. आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटाने हळदीला चार ते पाच हजार इतका अत्यल्प भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. हळद हे वर्षभराचे पीक असून उत्पादन खर्च मोठा आहे.

सध्याचे भाव पाहता उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. त्यामुळे हळदीला किमान दहा हजार रुपये हमीभाव शासनाने द्यावा या प्रमुख मागणीसह हळदीला पीकविमा संरक्षण देण्यात यावे, शासनाने हळदीची खरेदी करावी, नैसर्गिक आपत्तीत हळद पिकाला मदत देण्यात यावी, शासनाच्या विविध योजने अंतर्गत यांत्रिकीकरण व सिंचनासाठी लागणारे साहित्य हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, पीककर्ज वाटपात एकरी पन्नास हजार रुपये पीककर्ज हळद उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. 

शेतकरी अंगाला हळद लावून मागणीचे फलक हातात धरून छायाचित्रे काढून शासनाला पाठवतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी दिली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु यांनी केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...
बुलडाण्यात सोयाबीनबाबत २७०० पेक्षा अधिक...बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे...
विदर्भात खत कमतरतेमुळे जादा दराने विक्रीनागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची...
रत्नागिरी जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठारत्नागिरी : खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेत खत न...
सांगलीत खतांची कमतरतासांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान...
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...