नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात आंदोलन तीव्र

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात आंदोलन तीव्र
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात आंदोलन तीव्र

नांदेडः मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. २७) गोदावरी नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन, रास्ता रोको, सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध अशी विविध आंदोलने करण्यात आली. हिंगोली-नांदेड रस्त्यावर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी ट्रक पेटवून दिला.

नांदेड जिल्ह्यातील आमदुरा (ता. मुदखेड) येथे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलनकर्त्यांना रोकल्यामुळे दगडफेक करण्यात आली. आंदोलनकर्ते तसेच पोलिस जखमी झाले. वाहनांचे नुकसान झाले. जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूर तसचे रबरी बुलेटचा वापर करण्यात आला. माहूर तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील विटा (ता. सोनपेठ) येथे गोदावरी नदीपात्रातील पाण्यात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्यात आले. जिंतूर येथे मुंडन आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ-जिंतूर रस्त्यावरील येळी फाटा येथे रोको करण्यात आला.

हिंगोली-नांदेड रस्त्यावर आखाडा बाळापूर जवळील दाती येथे रास्ता रोकोदरम्यान ट्रक पेटवून देण्यात आला. आमदार रामराव वडकुते यांना धक्काबुक्की करण्यात आली. सेनगाव, कळमनुरी तालुक्यांत शासकीय कार्यालयांना आग लावण्याचे प्रकार घडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com