नाशिकला कांदा उत्पादकांचा ‘असहकार’ सुरू

व्यापारी व कांदा उत्पादक यांना काम सुरू ठेवण्यासाठी आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी सणाच्या तोंडावर बाजार बंद होणार नाही यासाठी सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी शासकीय यंत्रणेला पत्रव्यवहार केला आहे. सरकारने कांदा उत्पादक, व्यापारी, ग्राहक यांच्या हिताचा निर्णय काही तरी निर्णय घ्यावा. सुवर्णमध्य काढणे गरजेचे वाटते. - सुवर्णा जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव बाजार समिती
कांदा
कांदा

नाशिक: निर्यातबंदी, साठवणुकीच्या व्यवहारांवर मर्यादेच्या केंद्र सरकारच्या निर्बंधांनंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी कांदा बाजार समित्यांत न आणता ‘असहकार’ आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, जिल्ह्यातील बाजार समित्यांत कांदा आवकेत ८० ते ९० टक्क्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. लासलगावी हंगामात १० ते १२ हजार क्विंटलपर्यंत असणारी आवक १८७२ क्विंटलपर्यंत खाली आली आहे. 

केंद्र सरकारने ५ ऑक्टोबरपर्यंत कांदावरील निर्बंध न हटविल्यास बाजार समित्यांचे कामकाज प्रभावित करण्याचा निर्णय जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी घेतला होता. याकरिता गावोगावी कांदा उत्पादकांना आवाहन करण्यात आले. संघटनांनी दिलेली मुदत संपल्यानंतर कांदा उत्पादकांनी स्वत:च बाजार समित्यांत माल न आणून असहकार आंदोलन पुकारले आहे. परिणामी, जिल्ह्यातील बाजार समित्यांतील आवकेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  

ग्राहकांच्या हित जोपासण्यासाठी शेतकऱ्यांचा नेहमी बळी दिला जातो. सरकार कांदा व्यापारी किंवा शेतकरी प्रतिनिधींना विचारात घेत नाही हे अत्यंत घातक आहे. या पुढे असा अन्याय सहन करण्याची वेळ येऊ नये, अशी भूमिका घेत शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी सोमवार (ता. ७) कांदा लिलाव बंद आंदोलन पुकारले आहे. यानिमित्ताने कांदा विक्रीस आणू नये, असे आवाहन गेल्या आठवड्यापासून केल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक मंदावली आहे. यामुळे कांदा लिलाव बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

सरकारने निर्यातबंदी हटवून ती खुली करण्यात यावी, कांदा व्यापारावरील साठवणुकीचे निर्बंध हटविल्याचे आदेश पारित होईपर्यंत कांदा मार्केट बंद आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजार समित्यांचे कामकाज सुरू होते. मात्र, आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली. नामपूर बाजार समितीचे कामकाज साप्ताहिक कांदा लिलाव सुटीमुळे बंद होते. उमराणे बाजार समितीतील माल निकासी होत नसल्याने व्यापाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले. तर कळवण बाजार समितीचे कामकाज काही तांत्रिक कारणामुळे बंद होते. 

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून बाजार समिती आवारात येऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. कांदा विक्रीसाठी आणू नये, यासाठी शेतकऱ्यांच्या तर लिलाव करू नये यासाठी कांदा व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. जिल्हाभर कांदा लिलाव बंदची हाक गेल्याने सर्वत्र आवक घटल्याचे चित्र होते. सरकारने विचार करावा, नाहीतर मंगळवार (आज) पासून बाजार समित्या बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांनी दिली. याबाबत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुकास्तरावर तहसीलदार यांना निवेदने दिली आहेत. मात्र, दसरा झाल्यानंतर बुधवार (ता. ९) बाजार समितीचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा कायम आहे. 

प्रतिक्रिया शेतकऱ्यांवर अनेकदा अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा आवाज आम्ही कायम ठेऊ. मागील सप्ताहात बाजारभावात घट झाली होती. मात्र, सप्ताहानंतर धसका घेतला आहे. त्यासाठी अजूनही मागण्या पूर्ण होइपर्यंत मागे हटणार नाही.  - संतु पाटील झांबरे, ज्येष्ठ नेते, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना.  जर बाजार समितीने कामकाज चालू ठेवले. तर या आधी कांदापुरवठा होऊ देणार नाही, आम्हाला रास्त भाव द्या, आमच्या मागण्या मान्य करा तर आम्ही पण सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत.  - देविदास पवार,  प्रदेश उपाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना बाजार समितीत सोमवारी झालेली आवक आणि दर (रुपये/क्विंटल)

बाजार समिती किमान कमाल सर्वसाधारण आवक
लासलगाव १००० ३८२५ ३६०० १८७२ (*२३९०)
पिंपळगाव बसवंत २३०० ३६५१ ३९१२ ३९१८ (*४४०६)

टीप... *४ ऑक्टोबर (सप्ताह) अखेरची आवक  स्त्रोत : पणन मंडळ संकेत स्थळ आणि बाजार समिती 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com