थकीत एफआरपीसाठी शिरोळ तालुका बंद

थकीत एफआऱपीसाठी आंदोलन
थकीत एफआऱपीसाठी आंदोलन

कोल्हापूर   : व्याजासह थकीत एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांची जप्ती करून वसुली करण्याचे आदेश असताना शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव हे आपले काम तीन महिने झाले तरी करत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. ११) शिरोळ तालुक्यात बंद पाळण्यात आला. आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

जयसिंगपूर शहरासह अनेक गावांतील व्यवहार बंद राहिले. अनेक कारखान्यांची शेती कार्यालयेदेखील बंद राहिली. गेल्या काही दिवसांपासून ‘आंदोलन अंकुश’ने तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र तहसीलदार याप्रश्नी कारखान्यांवर कोणतीच कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ संघटनेने हे आंदोलन केले.

सकाळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर परिसरात सक्तीने दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. व्याजासह थकीत एफआरपी कारखाने देत नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com