केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा मोर्चा

केळी दर आंदोलन
केळी दर आंदोलन

जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी केली जावी, केळी उत्पादकांची व्यापारी व केळी पणन विषयांशी संबंधित घटकांकडून होणारी फसवणूक रोखावी आदी मागण्यांसाठी केळी उत्पादकांतर्फे शुक्रवारी (ता. १४) दुपारी रावेर शहरात मोर्चा काढण्यात आला.  रावेरातील छोरिया व्यापारी संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून हा मोर्चा निघाला. त्यात सुमारे १०० केळी उत्पादक, ग्रामस्थ आदी सहभागी झाले. मोर्चा शिस्तीने पुढे तहसील कार्यालयाकडे आला. तहसील कार्यालय व प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.  राहुल महाजन, जीवन जाधव आदींनी हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की केळीचे दर बाजार समित्या जाहीर करतात. परंतु जे दर जाहीर केले जातात, त्यानुसार केळीचे खरेदीदार, व्यापारी केळी खरेदी करीत नाहीत. जाहीर दरांच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० रुपयांपर्यंत कमी दरात केळीची सर्रास खरेदी केली जाते. बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात केळीची खेडा खरेदी किंवा थेट शेतात खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची फसवणूक होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे केळी उत्पादकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासन, शासकीय यंत्रणा यांनी ठोस कारवाई करायला हवी. केळीचा व्यापार नियंत्रणात आणला पाहिजे व शेतकऱ्यांची लूट बंद करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com