agriculture news in Marathi, agitation in Raver for banana rate, Maharashtra | Agrowon

केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा मोर्चा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी केली जावी, केळी उत्पादकांची व्यापारी व केळी पणन विषयांशी संबंधित घटकांकडून होणारी फसवणूक रोखावी आदी मागण्यांसाठी केळी उत्पादकांतर्फे शुक्रवारी (ता. १४) दुपारी रावेर शहरात मोर्चा काढण्यात आला. 

रावेरातील छोरिया व्यापारी संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून हा मोर्चा निघाला. त्यात सुमारे १०० केळी उत्पादक, ग्रामस्थ आदी सहभागी झाले. मोर्चा शिस्तीने पुढे तहसील कार्यालयाकडे आला. तहसील कार्यालय व प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी केली जावी, केळी उत्पादकांची व्यापारी व केळी पणन विषयांशी संबंधित घटकांकडून होणारी फसवणूक रोखावी आदी मागण्यांसाठी केळी उत्पादकांतर्फे शुक्रवारी (ता. १४) दुपारी रावेर शहरात मोर्चा काढण्यात आला. 

रावेरातील छोरिया व्यापारी संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून हा मोर्चा निघाला. त्यात सुमारे १०० केळी उत्पादक, ग्रामस्थ आदी सहभागी झाले. मोर्चा शिस्तीने पुढे तहसील कार्यालयाकडे आला. तहसील कार्यालय व प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

राहुल महाजन, जीवन जाधव आदींनी हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की केळीचे दर बाजार समित्या जाहीर करतात. परंतु जे दर जाहीर केले जातात, त्यानुसार केळीचे खरेदीदार, व्यापारी केळी खरेदी करीत नाहीत. जाहीर दरांच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० रुपयांपर्यंत कमी दरात केळीची सर्रास खरेदी केली जाते. बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात केळीची खेडा खरेदी किंवा थेट शेतात खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची फसवणूक होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करतात.

यामुळे केळी उत्पादकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासन, शासकीय यंत्रणा यांनी ठोस कारवाई करायला हवी. केळीचा व्यापार नियंत्रणात आणला पाहिजे व शेतकऱ्यांची लूट बंद करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...