..तर स्वतंत्र विदर्भासाठी मतपेटीतून धडा शिकवू : चटप

वामनराव चटप
वामनराव चटप

 अकोला  ः स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची पूर्वी सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने अाणि अाताच्या सत्तारूढ भाजपनेही दखल न घेतल्याने येत्या लोकसभा अाणि विधानसभा निवडणुकीत मतपेटीतून त्यांना धडा शिकवू, असा इशारा विदर्भ राज्य अांदोलन समितीचे नेते ॲड. वामनराव चटप यांनी दिला. 

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी २ ते १२ जानेवारी दरम्यान विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे आयोजन करण्यात आले अाहे. ही यात्रा शुक्रवारी (ता. ४) अकोल्यात दाखल असता ॲड. चटप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी माधवराव गावंडे, सुरेश झोगडे, घनश्याम पुरोहित, रंजना मामर्डे, डॉ. नीलेश पाटील, शंकरराव कवर, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, ललीत बहाळे, सतीश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकर अादी उपस्थित होते.

ॲड. चटप म्हणाले, की भाजपने १९९७ च्या भुवनेश्वरच्या कार्यकारिणीमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव केला होता. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तीन राज्यांची निर्मिती केली. परंतु विदर्भाची निर्मिती झाली नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने विदर्भाचे अभिवचन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी अामगाव ते खामगाव यात्रा काढली. नितीन गडकरीसुद्धा विदर्भाच्या बाजूने बोलायचे. परंतु अाता सत्तेत असताना यावर भाजप नेते बोलेनासे झाले अाहेत. यापूर्वी काँग्रेसनेही विदर्भाच्या मागणीचा विचार केला नाही. दोन्ही प्रमुख पक्षांनी विदर्भ मागणीची दखल न घेतल्याने अाता अागामी निवडणुकीत ‘ना भाजप, ना काँग्रेस’ या तत्त्वाने विदर्भ निर्माण महामंच लढणार अाहे.

विदर्भ विचाराच्या संघटना, पक्ष मिळून विदर्भ निर्माण महामंच तयार झाला अाहे. प्रमुख पक्षांना तिसरा पर्याय म्हणून हा महामंच काम करणार अाहे. सरकारने एक तर विदर्भ राज्य द्यावे किंवा विदर्भ सोडावा अशी भूमिका या महामंचाने घेतली असल्याचे ॲड. चटप यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com