agriculture news in marathi, agitation for several demands, parbhani, maharashtra | Agrowon

महायज्ञ आंदोलनात कर्जमाफीच्या शासन निर्णयाची आहुती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सुबुद्धी यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायज्ञ आंदोलन करण्यात आले. या वेळी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) आहुती देण्यात आली.

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सुबुद्धी यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायज्ञ आंदोलन करण्यात आले. या वेळी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) आहुती देण्यात आली.

शेतकऱ्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुख तसेच सन्मानाने जगता यावे, संपूर्ण कर्जमुक्तीसह शेतकरीहिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी द्यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायज्ञ आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जमाफी योजनेअंतर्गत २१ वेळा काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची (जीआर) आहुती यज्ञामध्ये देण्यात 
आली. 

शेती तसेच शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावणारे राज्य घटनेतील परिशिष्ट ९ रद्द करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, भास्कर खटिंग, डिगांबर पवार, मुंजाभाऊ लोडे आदींसह कार्यकर्ते, शेतकरी आंदोलन सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार :...चंद्रपूर   ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत चार हजारांवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत...
इराण–भारतादरम्यान कृषी उत्पादनांचा...मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे...कोल्हापूर  : या देशात राजे अनेक झाले, पण...
नाशिकच्या वैभवशाली इतिहासाला मिळणार...नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेस दीडशे वर्ष...
स्मार्टसिटी वादात शेतकऱ्यांवर अन्याय...नाशिक : नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद...
धुळे जिल्हा परिषदेत आता सभापती निवडीकडे...धुळे ः अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा...
सांगली जिल्ह्यात ९३८ कोटींची ऊसबिले थकीतसांगली ः जिल्ह्यातील बहुसंख्य साखर...
शेतमालाला मार्केटिंगची जोड दिल्याने...अकोला : जो शेतमाल पिकवला त्याची स्वतः विक्री...
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...