agriculture news in marathi, agitation for soyabean crop insurance issue, pune, maharashtra | Agrowon

सोयाबीन पीकविमाप्रश्‍नी शेतकरी संघर्ष समितीचे पुण्यात आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

पुणे  ः गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. या पिकाची नुकसानभरपाई विमा कंपनीने द्यावी, यासाठी शेतकरी संघर्ष समितीने पुण्यातील ओरिएंटल कंपनीच्या गेटला टाळे ठोको आंदोलन केले. या आंदोलनाची त्वरित दखल घेऊन एक महिन्याच्या आत नुकसानभरपाईची रक्कम देऊ, असे लेखी आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.   

पुणे  ः गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. या पिकाची नुकसानभरपाई विमा कंपनीने द्यावी, यासाठी शेतकरी संघर्ष समितीने पुण्यातील ओरिएंटल कंपनीच्या गेटला टाळे ठोको आंदोलन केले. या आंदोलनाची त्वरित दखल घेऊन एक महिन्याच्या आत नुकसानभरपाईची रक्कम देऊ, असे लेखी आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.   

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने समितीचे बीड जिल्हाध्यक्ष गंगाभीषण थावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील वाकडेवाडी येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या गेटला सोमवारी (ता. ७) टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. रामकिसन होके, बाबासाहेब म्हस्के, बाबूराव गायके, माणिक चव्हाण, बबन पुजारी, नवनाथ पायघन, सुहास सोनगुडे, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते. 

श्री. थावरे म्हणाले, की गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात आली होती. या योजनेत चौदा लाख ४९ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यापोटी ५३ कोटी रुपयांची रक्कम बॅंकेमार्फत विमा कंपनीकडे भरण्यात आली होती. त्यामुळे सुमारे पाच लाख ८९ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. त्यापैकी चार लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा भरला होता. मात्र, पाऊस न झाल्यामुळे  सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. नुकसानीपोटी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा रक्कम मिळणे बाकी आहे. ही रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...