उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन अंकुश’चा कोल्हापुरात ठिय्या

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ठिय्या आंदोलन
ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के व्याज मिळावे या मागणीसाठी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. २१) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

साखर कारखान्यांनी एफआरपीचा कायदा मोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी साखर आयुक्तालय कारवाईसाठी दिरंगाई करत आहे. येता गाळप हंगाम १ ऑक्‍टोबरला सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी उसाची मागील देणी भागविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची देणी भागविल्याशिवाय गाळप परवाना देता येणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या व्याजाची रक्कम कारखान्यांनी १६ सप्टेंबरपूर्वी द्यावी अशी मागणी केली होती. परंतु ही रक्कम मिळत नसल्याने आम्ही आंदोलन करीत असल्याचे आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.

आंदोलनात बळिराजा शेतकरी संघटनेचे  बी. जी. पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह आंदोलन अंकुश, बळिराजा शेतकरी संघटना, सांगली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com