agriculture news in marathi, agitation for sugarcane rate issue, sangli, maharashtra | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची पहिली ठिणगी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सांगली  : जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.१८) पलूस आणि कडेगाव तालुक्यातील ऊस वाहतूक रोखत, ट्रॅक्टरची हवा सोडली.

सांगली  : जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.१८) पलूस आणि कडेगाव तालुक्यातील ऊस वाहतूक रोखत, ट्रॅक्टरची हवा सोडली.

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा तिढा सुटलेला नाही, असे असताना सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसदराबाबत चर्चाही केलेली नाही. ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नसताना विटा तालुक्यातील उदगिरी शुगर साखर कारखान्याने पलूस आणि कडेगाव तालुक्यात ऊसतोडणी सुरू केली आहे. कारखान्याला ऊस वाहतूक सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवली. ट्रॅक्टरमधील हवा सोडून देऊन ऊस वाहतूक थांबवली.

येत्या शनिवारी (ता.२३) जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. त्यावेळी एफआरपी ठरणार आहे. जोपर्यंत एफआरपी ठरत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी...नाशिक : नाशिक व नगर जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र...
सोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी;...यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटल्याने...
वाशीम जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावीवाशीम ः जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वर्ग एक...
ठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा...मुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण...
रब्बी पेरणीपूर्वी जल, मृद संधारणसपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न? मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...