agriculture news in marathi, agitation for technology, akola, maharashtra | Agrowon

अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे लागवड
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

सरकारच्या नियमानुसार एचटीबीटी लागवड करणे हा जर गुन्हा असेल तर तो आम्हाला मान्य आहे. सरकार दुसऱ्या कुठल्याही तंत्रज्ञानाला बंधन घालत नाही; मात्र शेतकऱ्यांच्या फायद्याच्या तंत्रज्ञानावर बंदी घातली जाते. हा अन्याय आहे. जोपर्यंत सरकार अशी आधुनिक बियाणे रास्तपणे उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेचे हे आंदोलन सुरू राहील. यापुढील टप्प्यात आम्ही शेतकरी या तंत्रज्ञानाच्या स्वतः चाचण्या घेणार आहोत. साधा कापूस, बीटी कापूस आणि एचटीबीटी असा तीन प्रकारचा कापूस लागवड करून कुठल्या कपाशीवर कीड, रोग आला, कुठला कापूस फायदेशीर ठरला याचा डाटा आम्ही गोळा करू. त्याबाबतचा सविस्तर अहवाल सरकारला देऊ.
- अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना

अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने एचटीबीटी बियाण्याची लागवड करण्यात आली. 

जिल्ह्यात १० जूनला शेतकरी संघटनेकडून अकोली जहाँगीर येथे सविनय कायदेभंग करीत तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा घेण्यात आला होता. प्रतिबंधित असलेले एचटीबीटी बियाणे लावण्यात आले. त्यानंतर सोमवारी अडगाव बुद्रुक येथे याच आंदोलनाचा पुढील टप्पा झाला. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, सीमाताई नरोडे, ललित बहाळे, अनिल चव्हाण, सतीश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकार, राजाभाऊ कुजदेकर, माया कुजदेकर, प्रमिलाताई भारसाकळे, प्रफुल्ल बदरखे, नीलेश नेमाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. 

देशात शासनाने मागील नऊ वर्षांपासून जीएम तंत्रज्ञानाच्या चाचण्या बंद केल्या आहेत. ही बंदी तातडीने उठविण्यात यावी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, बियाणे मिळावे अशी मागणी शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. या आंदोलनात अकोट व तेल्हारा तालुक्यांतील शेतकरी एकत्र आले होते. श्री. कौठकर यांच्या शेतात ही बियाणे लागवड करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या सभेत श्री. घनवट, श्री. बहाळे, सीमा नरोडे यांच्यासह इतरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सरकार तंत्रज्ञानाच्या बाबतीत शेतकऱ्यांवर कसा अन्याय करीत आहे, याची मांडणी वक्त्यांनी आपल्या भाषणातून केली. या आंदोलनाच्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कृषी विभागाचे पथकही याठिकाणी दाखल झालेले होते. सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा याप्रकरणात दाखल झालेला नव्हता.
 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...